
लेखका विषयी
अनंत रामचंद्र कालेलकर
(बी.ए. , एस. टी. सी. , बी.एड. )
सन १९५५ मध्ये जाणीवपूर्वक शिक्षकी पेश स्वीकारला.
सन १९५६ पासून आकाशवाणीसाठी विविध विषयांवर गद्यलेखन; तसेच , आकाशवाणी व दूरदर्शनसाठी गीतलेखन.
सलग १३ वर्षे ‘दै. नवाकाळ’ मधून ‘शिक्षण: वृत्त – विशेष ‘, हा स्थंभ लिहिला.
पुढे काही काळ ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘शिक्षण -चित्रे ‘ हे सदर लिहिले.
‘मुंबई सकाळ ‘ मध्ये ‘माझं होम -माझी मुलं’ नावाची लेखमाला लिहिली.
मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत होते.
राष्ट्रासेवादलाचे संस्कार, पुढे पूज्य साने गुरुजी यांच्या ‘साधना’ साप्ताहिकात काम. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान- आंदोलन शिबिरात सहभाग.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग व तुरुंगवास.
मुंबई प्रार्थना समाजाचे सुमारे २५ वर्षे क्रियाशील सभासद आणि विश्वस्त पदापर्यंत विविध पदांवर कार्य.
‘कवी प्रफुल्लदत्त आदर्श शिक्षक पुरस्काराचे’ पहिले मानकरी. (सन १९८९).
प्रसिद्ध पुस्तके
1) ‘माझं होम -माझी मुलं’ (ग्रंथाली प्रकाशन)
2) सारे जहाँसे अच्छा …! (भटकंती भारताची)
3) ‘शिक्षक चळवळ’ (मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघाचे सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकाशन)
4) ‘शिक्षण: मते आणि विचार’ ( मजेस्टिक प्रकाशन)