No products in the cart.

ग्रंथसंपदा

माझं होम – माझी मुलं

सारांश: विनायक …वय वर्षे १७… रंग सावळा …. डोक्याचे बरेच केस पिकलेले … अंगाने सडपातळ ….अंगात निळी हाफ पँट, सफेद हाफ शर्ट. पळण्याचे कारण …

“खरंच, का पळाला विनायक ? का पळाला?” माझं एक मन दुसऱ्या मनाला प्रश्न विचारू लागलं. का पळाला विनायक ?

तू  त्याची आई बनू शकला नाहीस म्हणून – दुसऱ्या मनाने उत्तर दिलं.मी त्याची आई बनू शकलो नाही !खरंच, मी त्याची आई होऊ शकलो नाही .

सन १९५९ मध्ये सहाय्यक अधीक्षक (असिस्टअन्ट   सुपरिटेंडन्ट ) म्हणून  मी विलेपार्ले येथील डी . एन . सिरूर होममध्ये दाखल झालो. काहीशा अनिच्छेनेच! पण अल्पावधीतच त्या निरागस मुलांनी मला जिंकले. अक्षरशः भारून टाकले. पैकी ज्या मुलाचं प्रभाव माझ्या मनावर विशेष जाणवत होता त्यांची हि व्यक्तिचित्र. 

सारे जहाँसे अच्छा …! (भटकंती भारताची)

सारांश : विशेषतः  आजच्या आमच्या तरुणांना विदेशांचे विलक्षण आकर्षण असल्याचे जाणवते. पण आम्ही आमचा देश पाहिलाय काय? विविधतेने नटलेला इतका सुंदर देश साऱ्या जगात दुसरा नाही. 

हिमशिखरांची शुभ्रधवल शाल पांघरलेला महाकाय हिमालय, फेसाळणाऱ्या लाटांनी नटलेला हजारो किलोमीटर लांबीचा रुपेरी सागरकिनारा, शेकडो पवित्र नद्या, गोडया तसेच खाऱ्या पाण्याची देखणी मोठी सरोवरे, लाव्हा रसातून उभा ठाकलेला बलदंड सह्याद्री, थरचे भले मोठे वाळवंट, कच्छचे रण, गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील सुंदरबन, विविध प्रकारची जंगले, त्यातून विहरणारे देखणे- सुंदर प्राणी-पक्षी,भारताच्या उज्जवल इतिहासाची साक्ष देणारे महाल – वाडे व किल्ले, अमर लेणी व शिल्पे, भारताची प्राचीन संस्कृती जपणारी मंदिरे! किती किती म्हणून सांगावे? हे सारे ‘याची डोळा’पहायचे आहेच. पण तोपर्यंत? माझ्या ‘सारे जहाँसे अच्छा….!’ ह्या पुस्तकातून ‘भारताची भटकंती’ करायची आहे.हे सारे मनसोक्त अनुभवायचे आहे.मग, चला तर!

शिक्षक चळवळ

सारांश : साधारणपणे कोणतीही संघटना तिच्या सभासदांच्या भल्याचा – कल्याणाचा विचार करते. सभासदांच्या अधिकारांसाठी संघर्ष करते. मागण्यांसाठी आंदोलन करते. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढा देते.मग ती संघटना कामगारांची असो कि पायलटांची! आणि ह्यात गैर काहीच नाही. 

मात्र मला अपवाद दिसला तो शिक्षक संघटनेचा.विशेष करून ‘मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघाचा’. शिक्षकांचे अधिकार व मागण्या वगैरेंसाठी तर ह्या संघाने आंदोलने केलीच-लढे दिलेच. आणि ते यशस्वीही केलेच. पण त्याहीपेक्षा काही आगळे-वेगळे असे केले.घडवले. तसेच विविध विषय- अध्यापक मंडळांचे कार्य सुद्धा.मला ते आवडले.मनापासून भावले. त्यावर मी भरभरून लिहिले.पैकी काही लेखांना ‘शिक्षक चळवळ’ह्या नावाने ग्रंथरूप दिले.माझा तोच छोटेखानी ग्रंथ तुम्हा वाचकांपुढे मोठया आनंदाने उलगडत आहे.

शिक्षण : मते आणि विचार

सारांश : शिक्षण हा माझा ध्यास आहे तर विद्यार्थी (मुले) हा माझा श्वास आहे. एक उत्तम, परिपूर्ण व सहृदय माणूस घडवणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. ह्या विचारातून माझे शिक्षणविषयक लेखन घडले. आजही घडत असते.शिक्षणासंबंधीची माझी मते मी त्यातून मांडत असतो. त्यासंबंधीचे माझे विचार व्यक्त करीत असतो.

पाठ्यपुस्तकातून प्रारंभी छापलेल्या ‘प्रतिज्ञे’ पासून ‘परीक्षार्थी’ दृष्टीकोनापर्यंत आणि ‘शालेय ग्रंथालया’पासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘शिक्षां’पर्यंत अनेकविध विषयांवर मी माझी मते व विचार अत्यंत तळमळीने व परखडपणे मांडले आहेत. मात्र, माझा विचारच तेवढा खरा व परिपूर्ण असे कधीही मी मानले नाही. टीकेसाठी टीका मी कधीही केली नाही.हे नको असे मी जरूर लिहितो. पण त्याचवेळी त्याऐवजी नेमके काय हवे ते मी आवर्जून मांडतो.’शिक्षण:मते आणि विचार’ मध्ये वाचकांना ह्याचा प्रत्यय येईल.

पूर्ण पुस्तकासाठी इथे क्लिक करा